संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला विरोध केल्यासच देश वाचेल; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संविधान दिनाच्या निमिताने भाजपमधील नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला जात आहे. तर आघात नेतेही भाजपला पलटवार करत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील भाजप सरकावर हल्लाबोल केला आहे. केंद्रातील सत्ताधारी हे संविधान बदलू पहात आहेत. त्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रयत्न याच दिशेने सुरू आहेत. आज आपली जी काही ओळख आहे ती संविधानामुळे आहे. त्यामुळे संविधानात जर कुणी बदल करत असेल तर त्याचा कडाडून विरोध आपल्याला करायला हवा, असं सांगतानाच संविधान वाचलं तरच देश वाचेल, असे खासदार सुळे यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, आपण संपूर्ण राज्यभर संविधानाच्या संरक्षणासाठी उभे राहिले पाहिजे. अगदी मोठ्या स्वरूपात आंदोलन करणे शक्य झाले नाही तरी आपल्या पातळीवर आपल्याला काही गोष्टी करून संविधाना बद्दलच्या जाणिवांबाबत जागृती करता येऊ शकते. महाराष्ट्र सरकार संविधानासाठी काय करू शकेल यावर कार्यक्रम असायला हवा. पुढील पिढ्यांमध्ये संविधानाचे महत्त्व वाढत राहील याची काळजी आपणच घ्यायला हवी.

देशात राहत असलेल्या सर्वसामान्य माणसाला ज्या संविधानाने ताकद दिली त्या संविधानाचा सन्मान त्याला टिकवता आला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. संविधानाची ताकद होती म्हणूनच संयुक्त किसान मोर्चातल्या शेतकऱ्यांना लढा यशस्वी करता आला. आणि केंद्रसरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागले, असेही यावेळी खासदार सुळे यांनी सांगितले.

Leave a Comment