शब्दच्छल करणाऱ्यांनाही पवारांनी गारद केलंय; भुजबळांचा फडणवीसांवर पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या मुलाखतीवरून सुरू असलेल्या टोलेबाजीत आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी उडी घेतली आहे. शब्दच्छल करणाऱ्यांनाही पवारांनी गारद केलंय, असा टोला भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना त्यांचे नाव न घेता लगावला आहे.

संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीजर नुकताच राऊत यांनी ट्विटरवर टाकला असून, त्याला ‘एक शरद…सगळे गारद’ असे शीर्षक दिले आहे. त्यावर  देवेंद्र फडणवीस यांनी ‘सगळेच गारद असतील, तर उद्धव ठाकरेही गारद आहेत का’ असा खोचक सवाल एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता.

याशिवाय राऊत यांची मुलाखत घेऊन ‘एक नारद, शिवसेना गारद’ असे शीर्षक द्यावे, असे मेसेज आल्याची तिरकस टिप्पणीही फडणवीसांनी केली होती. त्याला भुजबळ यांनी तिरकस शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. ‘पवारांच्या मुलाखतीची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. बाकी शब्दच्छल करणाऱ्या सगळ्यांनाच शरद पवारांनी गारद केले आहे. त्यामुळे ‘एक शरद, सगळे गारद’ हे शीर्षक समर्पकच आहे,’ असे भुजबळ म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment