एकनाथ खडसेंच्या ईडी चौकशीवर भुजबळांनी दिली हि प्रतिक्रिया, म्हणाले कि…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे येथील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आता वाढ झाली असून याप्रकरणी ईडीकडून त्यांची गेली साडेपाच तास झाले चौकशी केली जात आहे.यावरून भाजप राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहार. खडसेंच्या ईडी चौकशीवरून त्यांनी म्हंटले आहे कि, “भाजपमधून बाहेर पडल्यास काय त्रास होतो हे त्यांना दाखवायचे आहे. हा भाजपचा एक प्रकारचा टॅक्टिक्सचा भाग आहे.”

भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी जावई गिरीश चौधरी यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. सकाळी अकरा वाजल्यापासून ईडीकडून खडसेंची चौकशी केली जात आहे. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. खडसेंच्या चौकशीवरून भुजबळांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

यावेळी भुजबळ म्हणाले कि, इतर पक्षात असलेल्या लोकांना भास द्यायचा. तो आपल्या पक्षात आला कि, त्याचे सर्व आरोप, गुन्हे माफ करायचे हा प्रयोग सध्या भाजपकडून केला जात आहे. अशा प्रकारचे राजकारण हा पक्ष करीत आहे. त्यांच्या या प्रकाराला खडसेंशी आम्ही सर्वजण नक्कीच उत्तर देणार आहोत, असेही भुजबळ म्हणाले.

Leave a Comment