भाजप हा जातीय वादी पक्ष, त्यांच्या रक्तातच मुस्लिम बांधवांबद्दल विष; राष्ट्रवादीच्या नेत्याची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुराच्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि परभणीत मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. याचे पडसाद अमरावतीत उमटले याठिकाणी हिंसाचाराची घटना घडली. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. “भाजप हा पक्ष जातीय वादी पक्ष असून त्यांच्या रक्तातच मुस्लिम बांधवांबद्दल विष आहे. अशा जातीयवादी भाजप पक्षाला आपण जाब विचारला पाहिजे, असे भरणे यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पाणी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजप या जातीयवादी पक्षातील लोकांकडून निवडणुकीत मतांसाठी विष पेरूण, मन कलुशित करून दंगल घडवण्याचा प्रयत्न केले जात आहेत. अशा प्रकारच्या जातीयवादी पक्षापासून आपण सावध राहिले पाहिजे. आज ज्या काही दंगली सुरू आहेत त्यामागे ही षड्यंत्र आहे.

दरम्यान यापूर्वीही महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून भाजपवर टीकास्त्र डागण्यात आले होते. त्रिपुरातील घटनेवरून आता भाजपकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले जात आहे. त्रिपुरामध्ये अशी कोणतीही घटना घडली नाही, या सर्व अफवा असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment