दिल्लीश्वरानी कितीही कारस्थाने केली तरी महाराष्ट्र कधीही झुकणार नाही- जयंत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्लीश्वरानी कितीही कारस्थाने केली तरी महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधीही झुकणार नाही असे म्हणत त्यांनी भाजपला आव्हान दिले. ते तळेगाव येथे बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या मावळात त्यांनी आम्हाला शिकवण दिली. झुकायच नाही, वाकायचं नाही, लढायचं. शेवट पर्यंत लढत असताना आपल्या महाराष्ट्रात दिल्लीश्वराने नेहमी कपट कारस्थान केली. दिल्लीचा हुकूमशाहा किती ही कावेबाज असला तरी महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकनार नाही. ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिली आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.

यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या अटके वरूनही भाजपवर निशाणा साधला. नवाब मलिक एनसीबी विरोधात बोलत होते म्हणून त्यांना खोट्या आरोपात गोवल गेलं. त्यांना त्यांची भूमिका मांडू न देता अटक करण्यात आली. जाणिवपूर्वक दाऊदचं नाव घेतले गेले आणि एका कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीला तुरुंगात टाकण्यात आलं, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.