हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील लखीमपूर या ठिकाणी हिंसाचाराची घटना घडली. त्याचे पडसाद महाराष्ट्र्भर काल उमटले. या घटनेवरून भाजपने टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “लखीमपूरमध्ये घडलेल्या घटनेनंतरही भाजप काही करणार नाही. अशा प्रकारे हिसाचार करणाऱ्या त्या मुलाच्या बापाला लाज वाटली पाहिजे होती. माझा मुलगा असा वागूच कसा शकतो. नथुरामच्या चिल्ल्या पिल्ल्यांना काय वाटत,” असे आव्हाड यांनी म्हंटले आहे.
आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, लखीमपूर या ठिकाणी हिंसाचाराची घटना घडल्यानंतर अंगावर शहारा आणणारे दृश्य पहायला मिळाले. समोर माणूस दिसत असताना अंगावर गाडी घातली. एकाने तर रिव्हॉल्ववरने गोळी घातली.
घडलेल्या घटनेनंतर त्याबाबत तेथील सत्ताधारी पक्षाकडून खेड व्यक्त करणे आवश्यक होते. मार दुखवटयाचा एक शब्दही सत्ताधारी पक्षाकडून येत नाही याचा अर्थ आम्ही करु तो कायदा, आम्हाला सत्तेचा माज आला आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे,” अशी टीका यावेळी आव्हाड यांनी केली आहेत.