Tuesday, February 7, 2023

क्रूझमधील रेव्ह पार्टीवर केलेली कारवाई नक्की कुणाची?; नवाब मलिकांचा सवाल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर शनिवारी, 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने (NCB) छापा टाकला. याठिकाणी सुरु असलेल्या पार्टीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अन्य 9 जणांवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाई प्रकरणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप व एनसीबीला प्रश्न विचारले आहेत.

एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये आर्यनसह अन्य ९ जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांना अटकही करण्यात आली आहे. यावेळी भाजप उपाध्यक्ष मनिष भानुशाली हेही हजर असल्याचे आढळून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नी मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

यावेळी मलिक म्हणाले की, एनसीबीने क्रूझवर कारवाई केलीच नाही. मनिष भानुशाली या व्यक्तीने आर्यन खानला ताब्यात घेतले होते. भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांसोबतही फोटो आहेत. भाजपच्या या कार्यकर्त्यांना अशी कारवाई करण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल मलिक यांनी केला आहे.

यावेळी मालिकांनी भाजप व एनसीबीला काही प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये मनीष भानुशाली क्रूझवर कसा?, मनिष भानुशाली हे भाजपचे उपाध्यक्ष आहेत. भाजपच्या कार्यकर्त्याला कारवाई करण्याचा अधिकार आहे का? भानुशाली यांचा गुजरात ड्रग्ज प्रकरणाशी काही संबंध आहे का? किरण गोसावी यांचा झोनल डिरेक्टरशी संबंध काय? अमली पदार्थांचे व्हायरल झालेले फोटो कुठले? असा प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणीही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मलिकांनी केली आहे.