राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिले भाजप प्रवेशाचे संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री राणाजगजीतसिंह पाटील हे सध्या राष्ट्रवादी मध्ये नाराज असल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी आज राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला दांडी मारून भाजप प्रवेशाचे संकेतच दिले आहे. त्याच झालं असं की राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज उस्मानाबाद शहरात दाखल झाली. या यात्रेच्या स्वागताला राणाजगजीतसिंह पाटील यांनी उपस्थित राहणे क्रमप्राप्त होते. मात्र ते या यात्रेला गैरहजर राहिले. त्यामुळे उस्मानाबादच्या राजकारणात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

धनंजय महाडिकांचं पण ठरलं ! या दिवशी करणार भाजपमध्ये प्रवेश

राणाजगजीतसिंह पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी सक्रिय राजकारणापासून अंतर ठेवले असले तरी त्यांचे पुत्र राणाजगजीतसिंह पाटील आणि सुनबाई अर्चना पाटील हे सध्या तरी सक्रिय राजकारणात कायम आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला या दोघांपैकी कोणीच उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या या कृतीबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जयदत्त क्षीरसागरांनी ५० कोटी रुपये देऊन मंत्रिपद घेतले ; पुतण्या संदीप क्षीरसागरने केले गंभीर आरोप

दरम्यान उस्मानाबाद येथे झालेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेला राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जीवनराव गोरे आदी नेते उपस्थित होते. तर राणाजगजीतसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला नजाता फेसबुकवर भाजप सरकारवर पोस्ट टाकून त्यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.

राष्ट्रवादी सोडताना दिलीप सोपल यांनी शरद पवारांबद्दल केले हे विधान

Leave a Comment