ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपवताना हा कळवळा कुठे गेला होता.? रोहिणी खडसेंचा भाजपला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणावरून भाजपने ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीत सगळ्या जागांवर ओबीसी उमेदवारांनाच संधी देणार असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

रोहिणी खडसे यांनी ट्विट करत म्हंटल की, भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता…? आता गळा काढण्यात अर्थ नाही, असं त्यांनी म्हटत फडणवीसांना टोला लगावला आहे.

जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडताना फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. ओबीसी नेतृत्व डळमळीत करण्याचं कामही फडणवीसांनी अनेकदा केल्याचं खडसेंनी म्हटलं. याचाच संदर्भ घेत रोहिणी खडसे  यांनी भाजप आणि फडणवीस यांना लक्ष केले आहे. आता भाजप कडुन यावर काय प्रत्युत्तर येत हे पहावे लागेल.