उस्मानाबाद । ”राज्यात शरद पवार यांच्या इतका जाणकार नेता नाही. संकट काळात केंद्र आणि राज्य सरकारची मदत करण्याची क्षमता आणि नियम हे सर्व शरद पवार यांना नेमके ठाऊक आहे. परंतु, सध्या त्यांच्यावर राज्य सरकारचा बचाव करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. त्यामुळे शरद पवार सध्या सरकारच्या सोईसाठी मोजकंच बोलत आहेत”, अशी टिप्पणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करत आहेत. आज उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने कर्ज काढण्याच्या शरद पवार यांच्या निर्णयाचे समर्थन केले.
”कर्ज काढतोय म्हणजे आपण काही पाप करतो असे नव्हे. अर्थसंकल्पातील तरतुदी पूर्ण करण्यासाठी सरकार नेहमीच कर्ज काढते, नंतर त्याची परतफेड करते. संकटाच्या काळात सरकारला कर्ज घ्यावेच लागते. रिझर्व्ह बँकेने नव्याने आखून दिलेल्या मर्यादेनुसार महाराष्ट्राला 1 लाख 20 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची मुभा आहे. आतापर्यंत महाराष्ट्राने आपण केवळ 60 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सहज कर्ज काढू शकते,” असे फडणवीस यांनी सांगितले.
याशिवाय फडणवीस यांनी केंद्र सरकारने मदत द्यावी, अशी मागणी करणाऱ्या महाविकासआघाडीच्या नेत्यांनाही फटकारले. एरवी महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये बरेच मतभेद आहेत. मात्र, केंद्राने मदत द्यावी, या मुद्द्यावर तिन्ही पक्ष एकमताने बोलतात. एकूणच तिन्ही पक्ष हात झटकण्यात तरबेज आहेत. केंद्र सरकार राज्याला भरघोस मदत नक्कीच देईल. पण राज्य सरकारने प्रथम आपण काय मदत देणार, हे स्पष्ट करावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
‘शरद पवारांनी कृषी विधेयकांचे समर्थन केलंय’
शरद पवार यांनी तुळजापूरच्या पत्रकारपरिषदेत शेतकरी कृषी कायद्याला घाबरत असल्याचे वक्तव्य केले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी कृषी कायदा ही शरद पवार केंद्रात सत्तेत असतानाचीच कल्पना असल्याचे सांगितले. त्यांच्याच सरकारने ही कल्पना मांडली होती. शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रातही कृषी कायदा कशाप्रकारे योग्य आहे, हे सांगितल्याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली.
सरकारनं ठरवलं तर सारं काही शक्य, पण दुर्दैवानं मी मुख्यमंत्री पदावर राहिलो नाही'- देवेंद्र फडणवीस
वाचा सविस्तर -👉 https://t.co/JBv4KSNOnC@OfficeofUT @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 20, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”