…तर मी फासावर जाण्यास तयार ; मेहबूब शेख यांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. परंतु आपल्यावर बलात्काराचा नाहक आरोप करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. हवं तर माझी नार्को टेस्ट करा, ज्या दिवशी गुन्हा झाल्याचे म्हंटलं तेव्हा मी कुठे होतो याचीही चौकशी करा अस आवाहन त्यांनी पोलिसांना केलं. आपल्यावरील आरोप फेटाळताना त्यांना अश्रू अनावर झाले.

मेहबूब शेख यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, “गुन्हा दाखल झाल्याची माहिती मला पत्रकारांकडून मिळाली. यानंतर मी संबंधित पोलीस स्टेशनला फोन करुन माहिती घेतली. तपास अधिकाऱ्यांना फोन करुन माझी तक्रारदार तरुणीशी काहीच ओळख नसून कधीही भेटलो नाही अशी माहिती दिली. माझे फोन रेकॉर्ड तपासा, हवं तर नार्को टेस्ट करा असं सांगितलं”.

“सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा राजकारणात मोठ्या पदावर गेल्यानंतर त्याचं राजकीय करिअर अशा खोट्या केसेस करुन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असेल तर हा दुर्दैवी प्रकार आहे. मी दोषी असलो तर कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे. खोट्या केसेस करून फक्त राजकीय द्वेषापोटी कोणी केलं आहे का याचाही पोलिसांनी तपास करावा,” असं मेहबूब शेख यांनी सांगितलं आहे.

राजकारण करायचं असेल तर त्यासाठी अनेक गोष्टी आहेत सांगताना त्यांनी तक्रारीत उल्लेख असणारा मेहबूब शेख कोण आहे याचा शोध घ्या अशी विनंती पोलिसांना केली. सोबतच महिलेची नार्को टेस्ट करण्याची आणि तिचा बोलवता धनी कोण आहे याची माहिती घ्या अशी मागणी केली. पुरावा सापडल्यास आपण फासावर जाण्यास तयार आहे असंही ते म्हणाले आहेत. यावेळी बोलत असतानाच मेहबूब शेख यांना अश्रू अनावर झाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment