राष्ट्रवादीला अजून एक धक्का ; मंत्री छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून आता राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते आणि राज्याचे अन्न पुरवठा आणि नागरी संरक्षण मंत्री  छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे .दरम्यान, त्यांची प्रकृती ठीक असून गेल्या 2 ते 3 दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.मास्क,सॅनिटायझर चा नियमित वापर करा. असं ट्विट छगन भुजबळयांनी केलं आहे. 

दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये सोमवारी रात्रीपासून संचारबंदी लागू करण्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत ही संचारबंदी लागू असेल. तसेच विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून १ हजार रुपये दंड आणि प्रसंगी गुन्हा दाखल करायचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

दरम्यान यापूर्वी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment