पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर धनंजय मुंडे म्हणाले…

मुंबई । परळीची राहवाशी असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड याचे नाव भाजपाकडूनघटिले जात आहे, यासाठी पुरावा म्हणून देण्यात येत असलेला ऑडिओ क्लिपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरू आहे. पूजाच्या आत्महत्येसंदर्भात ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल क्लिपवरून भाजपने ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आता मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पूजा चव्हाणची हत्या नाही, तर पूर्णपणे आत्महत्याच आहे. तसेच या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहे. पण या आत्महत्याप्रकरणी चौकशी देखील सुरु आहे. त्यामुळे चौकशीनंतर यावर अधिक बोलता येईल, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

याशिवाय, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील आता पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य केलं आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन चौकशी करण्याची मागणी भाजपाकडून होत आहे. मात्र संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल. चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार त्याबाबतचा निर्णय घेईल, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like