…तर भाजपला निवडणुकीत रोखणं कठीण होईल; राष्ट्रवादीच्या आमदाराची कबुली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुकींतील निकाल पाहता व भाजपकडून महाविकास आघाडीला दिलेली टक्कर पाहता आगामी निवडणुकांत भाजपचे आघाडीपुढे कडे आव्हान असणार हे नक्की झाले आहे. याबाबात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही कबुली दिली आहे. “यापुढे निवडणुका लढताना महाविकास आघाडीने आत्मचिंतन करण्याची गरज असून सर्वांनी एकत्र येऊन भाजपला रोखलं पाहिजे. स्वतंत्र गेलो तर भाजपला निवडणुकीत रोखणं कठीण होईल,” असे मिटकरींनी म्हंटले आहे.

अकोला येथे पोट निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींना चांगलाच धक्का दिला. अकोला जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. यामध्ये भाजप १, शिवसेना १, राष्ट्रवादी २, काँग्रेस १ आणि इतर ९ (यामध्ये प्रहार १) जागा जिकल्या आहे. या निकालानंतर आमदार अमोल मिटकरींनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पोट निवडणुकीत महाविकास आघाडीची बेरीज भाजपपेक्षा सरस आहे. मात्र, या पुढे स्वबळावर लढलो तर भाजपला यश मिळत राहील.

आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महानगरपालिकांच्या निवडणुकाही होतील. त्यावेळी आपण सर्वांनी भाजप विरोधात एकत्र आले पाहिजे. जर आपण एकत्र आलो नाही तर आपण यश मिळवू शकणार नाही. अकोल्यात ग्रामीण भागात राष्ट्रवादीची कामगिरी चांगली आहे. बच्चू कडूंनी भाजपसोबत छुपी युती केली. त्यामुळे महाविकास आघाडीला फटका बसला असल्याची टीकाही मिटकरींनी यावेळी केली.

Leave a Comment