राष्ट्रवादीच्या आमदाराला ठार मारण्याची धमकी; निनावी पत्राने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिरूर-हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ॲड. अशोक पवार यांचा ‘एखाद्या दिवशी भरचौकात यांचा महेंद्र मल्लावसारखा कार्यक्रम होणार,’ अशी भाषा वापरत त्यांना जीवे मारण्याची धमकी एका पत्राद्वारे देण्यात आली आहे. या पत्रामुळे शिरूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच या धमकीपत्रानंतर शिरुर-हवेली मतदारसंघात तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.

लोकप्रतिनिधींना अशा धमक्या येत असतील तर त्यांनी कामे कशी करायची असा सवाल विचारला जात आहे. तसेच पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी आमदार अशोक पवार यांनी केली आहे. दरम्यान, ही धमकी नेमकी कोणी दिली ? का दिली हे अजूनतरी समजू शकलले नाही.

दरम्यान, या निनावी पत्रात आमदार अशोक पवार यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. अशोक पवार यांनी भूखंड लाटला असून विकासकामांधील अनेक कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. आमदार पवार यांच्या पत्नी देखील नगरपालिकेच्या कामांमध्ये लुडबूड करत आहेत असा आरोप करण्यात आला आहे.

Leave a Comment