पुणे । आमदार रोहित पवार यांचे ससून येथील महिला कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले. कोरोना वॉरियर्ससोबत रक्षाबंधन साजरा केल्यानं महिला कर्मचारी देखील यावेळी भावूक झाल्या. ससून येथील महिला कर्मचाऱ्यांनी आमदार रोहित पवार यांना राखी बांधत औक्षण केलं.
यावेळी सॅनिटायझर, मास्कची रोहित पवारांकडून ओवाळनी देखील कोरोना यौद्धांना देण्यात आली. कोरोना वॉरियर्सचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेन असा देखील शब्द यावेळी रोहित पवार यांनी दिला. या वेळी ससून मधील कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्याची महिला कर्मचाऱ्यांची रोहित पवार यांच्याकडे मागणी केली.
आपल्या अनेक भगिनी राज्यभरात #कोविड योद्धे म्हणून काम करतात. त्यांच्या रक्षणाची जबाबदारी भाऊ म्हणून आपल्या सर्वांची आहे. त्यामुळं आज प्रतिनिधीक स्वरूपात ससून आणि नायडू हॉस्पिटलमधील #कोरोना वार्डमध्ये काम करणाऱ्या नर्सेस भगिनींच्या हातून राखी बांधून घेतली. pic.twitter.com/p3tfeDyFOW
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 3, 2020
यावेळी सॅनिटायझर, मास्कची रोहित पवारांकडून ओवाळनी देखील कोरोना यौद्धांना देण्यात आली. कोरोना वॉरियर्सचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेन असा देखील शब्द यावेळी रोहित पवार यांनी दिला. या वेळी ससून मधील कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्याची महिला कर्मचाऱ्यांची रोहित पवार यांच्याकडे मागणी केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”