शेतकऱ्यानं फिरवला कांद्यावर ट्रॅक्टर; रोहित पवारांनी भेट घेत केली Facebook Post

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घाम गाळून पिकवलेल्या पिकाला योग्य किंमत मिळाली नाही तर जगणं कठीण होऊन जात. अशीच अवस्था सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. त्यांच्या काढायला भाव मिळत नसल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. निर्यातबंदीमुळं शेतकऱ्यांना मातीमोल भावात कांदा विकावा लागत आहे. त्यामुळे नाशिकमधील नैताळे (ता. निफाड) येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपल्या शेतातील कांद्यात ट्रॅक्टर फिरवला आहे. या शेतकऱ्याची कर्जतचे जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी फेसबुक पोस्टही केली.

कांदा उत्पादक शेतकऱ्याची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमधून कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या आहेत. तसेच केंद्र सरकारवर निशाणाही साधला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याची भेट घेतल्यानंतर त्यांची कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने भेट घेतली कि त्याने मुख्यमंत्री आणू उपमुख्यमंत्री यांना रक्ताने पत्र लिहले आहे. हा शेतकरी तर कांद्याचा अग्निडाग हे प्रतिकात्मक आंदोलन करणार आहे. यावेळी त्यांनीही आपली व्यथा मांडली.

 शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतात घेत असलेलया शेतमालास किती दर मिळाला आहे. हे रोजचे बाजारभाव चेक करणे खूप गरजेचे आहे. यामुळे भाव कधी वाढले? किती रुपयांनी वाढले यासोबतच सर्वाधीक भाव कुठे मिळत आहे यानुसार आपण आपला शेतमाल विक्री करून अधिक नफा कमावू शकतो. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi या मोबाईल अँपच्या मदतीने आता शेतकरी स्वतः आपल्याला हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील ताजा बाजारभाव चेक करू शकतो. तुम्हीही या अतिशय महत्वाच्या सेवेचा मोफत लाभ घेण्यासाठी आजच तुमच्या मोबाईलवर Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

सरकारने त्वरित निर्यातबंदी उठवावी

द्राक्ष व कापसाचीही हीच अवस्था आहे. एक पीक गेलं तर शेतकऱ्याचं किती नुकसान होतं, याची कल्पना सरकारला नाही. पण त्यांनी शेतकऱ्याचं दुःख समजून घेऊन त्वरित निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

केंद्र सरकरचे चुकीचे धोरण

नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरात सर्वात जास्त कांदा उत्पादन घेतलं जातं. मात्र, मागील 8 वर्षांपासून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळं उत्पादकांना खर्च वजा करुन नफा मिळत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी यावेळी रोहित पवार यांना दिली.

https://www.facebook.com/RRPspeaks/posts/760334478782018

दर नसल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक येथील शेतकरी चिंतेत आहेत. काही शेतकरी आपल्या शेतातील कांद्याचे पीकच काढून टाकत आहेत. कारण कांद्याला मिळणाऱ्या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणं शक्य होत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना फटका बसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नागापुर येथील शेतकरी सुभाष निंबोरे यांनी देखील एक एकर कांद्यावर रोटाव्हेटर फिरवला आहे.

चार एकर क्षेत्रातील कांद्यावर सोडल्या शेळ्या

नाशिक जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पिंपरने येथील शेतकरी धनंजय थोरात यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात लागवड केलेल्या कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवला. धनंजय थोरात यांनी या कांदा पिकासाठी आतापर्यंत जवळपास दोन लाख रुपये खर्च केला होता. मात्र, कांदा काढणीला आला असतानाच अचानक कांद्याचे भाव कोसळले. खर्चही निघणार नसल्यानं हवालदिल झालेल्या थोरात यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात काढणीला आलेल्या कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवला तसेच शेळ्या सोडल्या आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त कांदा उत्पादनाचे क्षेत्र

देशात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन महाराष्ट्रात होत असून त्यातील नाशिकमध्ये केले जाते. या ठिकाणाहूनच इतर राज्यांना कांद्याचा पुरवठा केला जातो. मात्र, यंदा महाराष्ट्रात कांद्याचे दर घसरले आहेत. कांद्याला रास्त भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. कांद्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांशी सौदेबाजी करत आहेत. असं असतानाही कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.