इथं विषय चाललाय काय, आपण बोलताय काय! रोहित पवार आणि भाजप नेत्यात ट्विटवर शाब्दिक बाचाबाची

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळं विद्यापीठ अनुदान आयोगानं (यूजीसी) परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली होती. त्यानंतर रोहित पवार आणि भातखळकर यांच्यात ट्विटवर वॉर सुरु झालं आहे.

विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगानं नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी करत सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. दरम्यान, परीक्षा रद्द करण्याविषयी आमदार रोहित पवार यांनी यूजीसीकडे मागणी केली होती. यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केलं होतं. रोहित पवार यांच्या ट्विटवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली. “तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे? घरी बसल्याबद्दल सर्वाधिक चर्चा राज्यात कुणाबद्दल चालली आहे ते ठाऊक आहे ना?,” असं भातखळकर म्हणाले.

भातखळकर यांनी केलेल्या टीकेला रोहित पवार यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिलं. “इथं विषय चाललाय काय आणि आपण बोलताय काय! विद्यार्थ्यांच्या जिवापेक्षा तुम्हाला फक्त राजकारण महत्त्वाचं आहे, हे गेल्या चार महिन्यांत सगळ्यांनीच पाहिलंय. त्यामुळं राजकारणाशिवाय आपल्याला दुसरं काही बोलताच येत नसेल तर शांत बसलेलंच अधिक योग्य राहील,” असा टोला पवार यांनी लगावला आहे.

इथून पडली रोहित पवार आणि भातखळकर यांच्यात ट्विटवर वॉरची ठिणगी
“कोरोनाला घाबरून स्वतः सुरक्षितपणे ऑनलाईन मिटींग घेणाऱ्या यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरुन विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये. प्रचंड मानसिक तणावात असलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक विद्यार्थी परीक्षेबाबत त्यांच्या तीव्र भावना रोजी आम्हा लोकप्रतिनिधींकडे व्यक्त करतात. कोरोनाच्या आजच्या परिस्थितीत आपण स्वतःच्या मुलाला तरी त्याचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवू का? हा प्रश्न यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःला विचारावा आणि विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ‘परीक्षा’ या विषयाचा एकदाचा ‘निकाल’ लावावा”, अशी विनंती रोहित पवार यांनी केली होती. रोहित यांच्या या ट्विटवरून अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर हल्लाबोल सुरु केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment