Tuesday, February 7, 2023

संसदेचं अधिवेशन रद्द; रोहित पवारांनी राज्यातील भाजप नेत्यांना पकडलं कोंडीत, म्हणाले…

- Advertisement -

पुणे । संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य अधिवेशनाच्या कालावधीवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना चांगलाच कोंडीत पकडलं आहे. ‘भाजपची केंद्रात एक तर राज्यात दुसरी अशी नेहमीच सोयीची व दुटप्पी भूमिका राहिलीय,’ असा टोलाच पवार यांनी लगावला आहे. ‘राज्यात दोन दिवसांचे अधिवेशन घेणारे महाविकास आघाडी सरकार हे आठवं आश्चर्य असल्याची टीका भाजपचे नेते करतात. मग केंद्रातील अधिवेशन रद्द झाल्याचा निर्णय हे कितवं आश्चर्य आहे, हेही त्यांनी सांगाव,’ असेही पवार यांनी म्हटले आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. महाराष्ट्रात विधिमंडळाचं दोन दिवसांचं अधिवेशन कालच संपले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा कालावधी कमी करून दोन दिवसांचा करण्यात आला. मात्र, त्यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजपने सरकारवर टीकेची झोड उठवली होती. ‘महाविकास आघाडी सरकार हे आठवे आश्चर्यच आहे,’ असा टोलाही भाजप नेत्यांनी हाणला होता. तोच धागा पकडत आता रोहित पवार यांनी संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द झाल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. याबाबत रोहित पवार यांनी ट्विट् केले असून त्यामध्ये त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

पवार यांनी म्हटले आहे, ‘भाजपची केंद्रात एक तर राज्यात दुसरी अशी नेहमीच सोयीची आणि दुटप्पी भूमिका राहिलीय. राज्यात दोन दिवसांचं अधिवेशन घेणारं महाविकास आघाडी सरकार हे आठवं आश्चर्य आहे,अशी टीका भाजपचे नेते करतात,पण केंद्राने तर हिवाळी अधिवेशनच रद्द करण्याचा निर्णय घेतला. मग हे कितवं आश्चर्य आहे?, असा बोचरा सवाल पवार यांनी केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’