किरीट सोमय्या म्हणजे भाजपची आयटम गर्ल; नवाब मलिकांची जळजळीत टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमैय्या म्हणजे हे एखाद्या चित्रपटातील आयटम गर्ल असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. नवाब मलिक हे नांदेड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी किरिट सोमय्या यांच्यावर टीका केली.

चित्रपट जशी चालवण्यासाठी आयटम गर्लची गरज लागते. मला वाटतं राजकीय क्षेत्रामध्ये किरीट सोमय्या भाजपाच्या आयटम गर्ल सारखे राजकारण करत आहेत. बातमी कशी होईल त्यासाठी आयटर्म गर्लचा कार्यक्रम सुरु आहे,” असे नवाब मलिक यांनी म्हंटल.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून किरिट सोमय्या सातत्याने सरकार मधील मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करत आहेत. कागदपत्रांच्या आधारे ते महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस नेत्यांविरोधात कारवाई साठी प्रयत्नशील असतात.