भंगारच्या धंद्याचा मला अभिमान, मी सोन्याची तस्करी केली नाही; मलिकांचा मोहित कंबोज यांच्यावर पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील क्रुझ वरील ड्रग पार्टी प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ला अटक करण्यात आल्यानंतर राज्यात राजकीय आरोप – प्रत्यारोप होत आहे. यावेळी 11 लोकांना पकडण्यात आलं मात्र मोहित कंबोज यांच्या म्हेवण्याला का सोडलं असा सवाल नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर कंभोज यांनी देखील पत्रकार परिषद घेत नवाब यांच्यावर टीकास्त्र सोडलं. दरम्यान, मलिक यांनी कंभोज यांच्यावर पलटवार केला.

“मोहित कंबोज काल मला कचरावाला,भंगारवाला बोलले. मला अभिमान आहे. माझे वडील, मी स्वत:, माझ्या घरातली लोकं हे. भंगाराचा धंदा करत आहेत. कायदेशीर धंदा करणं त्याचा मला अभिमान आहे. मी कुठल्याही मार्केटला बुडवलं नाही. सोन्याची तस्करी केली नाही. सोन्याच्या बाजारात बनावटपणा केला नाही. मी कधीही कुठल्याही बँकेचे पैसे बुडवले नाहीत असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.

ज्यांच्यावर सीबीआयच्या धाडी पडल्या आहेत. ६७ कोटी बुडवले आहेत ते माझं, माझ्या कुटुंबाचा धंदा काढतायत. हो आम्ही भंगाराचा धंदा करतो. पण आम्ही सोन्याच्या नावाने कुणालीह लूटत नाही नाही बँकेचे पैसे बुडवत नाही,” असा पलटवार नवाब मलिक यांनी केला. तसंच आपण 100 कोटींच्या अब्रुनुकसानीच्या नोटिशीची वाटच बघत आहे असेही ते म्हणाले

Leave a Comment