…म्हणून योगी विरुद्ध मोदी असं चित्र भाजप कडून निर्माण केलं जात आहे; नवाब मलिकांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील काही दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये मतभेदाचे वातावरण असल्याच्या बातम्या देशात आणि उत्तर प्रदेशमधून समोर येत आहेत. परंतू करोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपाची ही ठरवून केलेली रणनीती असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक म्हणाले की, कोरोना काळात उत्तरप्रदेशमधील गंगा नदीत कोरोना बाधित लोकांचे मृतदेह फेकण्यात आल्याचे भयावह चित्र अख्खा देशानं आणि जगानं पाहिलं. यामुळे योगी सरकारच्या कारभाराचे वाभाडे निघाले. उत्तर प्रदेशातील हे अपयश झाकण्यासाठी मोदी विरुद्ध योगी असे चित्र उभे करण्याचा भाजपचा प्लॅन तयार असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितले.

चार वर्षांत योगींनी आपल्या कार्यकाळात फक्त राज्यात घृणा निर्माण केली आहे. सर्वसामान्य जनतेला फायदा होईल अशी एकही योजना उत्तर प्रदेशमध्ये राबवण्यात आली नाही. करोनात फक्त सरकारच्या तिजोरीतील निधी मोठमोठ्या जाहिरातींवर खर्च करण्यात आला असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आपला पराभव होणार हे भाजपा आता समजून चुकली आहे. त्यामुळेच भाजपा चिंताग्रस्त झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागणार हे निश्चित आहे, असेही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment