भाजप हा शेतकऱ्यांना लुटणारा पक्ष ; नवाब मलिक यांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यांना देशातील शेतकर्‍यांचा विरोध आहे. इतक्या दिवसांनंतर याबाबत देशातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा नवा उपक्रम भाजपने सुरू केला आहे. पण विश्वासघाताचं राजकारण करणार्‍या भाजपने आधी स्वत:ची विश्वासहार्यता दाखवावी, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांनी केली. नवीन कायदा हा शेतमालाची लुट करणारा कायदा आहे. भाजप पक्ष हा मुळात शेतकऱ्यांचा पक्ष नाही, शेतकऱ्यांना लुटणारा पक्ष आहे असे नवाब मलिक म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी शेतकरी सन्मान निधी खात्यात प्रत्येकी सहा हजार रुपये पाठवणार आहेत. त्यावर नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. निवडणुका आल्यावर पैसे वाटण्याचे काम भाजपाने आधीही केले आहे असे ते म्हणाले.

सहा हजार रुपये शेतकर्‍यांना देता आणि त्यांना पैसे परत करण्यासाठी नोटीसाही पाठवता… हे नक्की काय चाललंय? उद्या शेतकर्‍यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत. या संवादाला भाजपाचेच कार्यकर्ते बसलेले दिसतील आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खोटा प्रचारही करण्याचा प्रयत्न करतील, असा आरोप देखील त्यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment