हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपने केली असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. अजित पवार तुम्ही 2024 च्या अगोदरच जेलमध्ये असाल, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, अजित पवार आता तुम्हाला कोणी वाचू शकत नाही. तुम्ही जेवढी मस्ती केली ती या आयुष्यातच भरावी लागणार… कोणालाही उर्मट बोलायचं, कोणाचे राजकीय किंवा कौटुंबिक आयुष्य उध्वस्त करायचं, नियती कोणाला सोडत नाही अजित पवार. २०२४ ला तुमचा पराभव बघायचा होता पण तुम्ही त्या अगोदरच जेलमध्ये असाल असे निलेश राणे यांनी म्हंटल.
अजित पवार आता तुम्हाला कोणी वाचू शकत नाही. तुम्ही जेवढी मस्ती केली ती या आयुष्यातच भरावी लागणार… कोणालाही उर्मट बोलायचं, कोणाचे राजकीय किंवा कौटुंबिक आयुष्य उध्वस्त करायचं, नियती कोणाला सोडत नाही अजित पवार. २०२४ ला तुमचा पराभव बघायचा होता पण तुम्ही त्या अगोदरच जेलमध्ये असाल.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 30, 2021
अजित पवारांवर भाजपचे काय आरोप आहेत –
अनिल देशमुख यांच्या वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकश अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी भाजप कार्यकारिणीने केली आहे.