विरोधकांनी माझा बाप काढला, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत सर्व विरोधकांना घायाळ करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी आपल्या विजयानंतर विरोधकांना पुन्हा एकदा इशारा दिला.आजच्या या विजयानंतर त्यांना माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, असे रोहित पाटील यांनी म्हंटल.

रोहित पाटील यांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र आले होते. त्यानंतर रोहित पाटील यांनी प्रचाराची सर्व धुरा स्वतःच्या खांद्यावर घेत दमदार प्रचार केला होता. रोहित पाटील यांनी प्रचारादरम्यान विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला होता. निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर आबांची आठवण होईल, असा इशारा त्यांनी दिला होता.

आज कवठे महांकाळ निवडणुकीत रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळवल्यानंतर रोहित पाटील यांनी पुनः एकदा विरोधकांवर निशाणा साधला. निवडणुकीच विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं होतं. माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही,” अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी विजयानंतर दिली.

Leave a Comment