उशिराने का होईना फडणवीसांकडून सहकार्य मिळाल : रोहित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यासाठी काल राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत वीकेंडला कडक लॉकडाऊन आणि इतर दिवशी अंशत: लॉकडाऊन (कडक निर्बंध) लावण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया सरकारच्या निर्णयाला पाठिंबा जाहीर केला. या संकटात आम्ही सरकारसोबत आहोत. सरकारने जी नियमावली आखून दिली आहे त्याचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असे आवाहन करीत भाजपचे कार्यकर्तेही जिथे आवश्यक आहे तिथे सहकार्य करतील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. फडणवीसांनी घेतलेल्या सहकार्याच्या भावनेबाबत राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ट्विटरद्वारे  आज आभार मानले.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, ” राज्याच्या हितासाठी उशिरा का होईना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहकार्य मिळाले आहे. हे पाहून बरं वाटलं. केंद्राकडे प्रलंबित निधी आणि लसीचे पुरेसे डोस मिळण्यासाठीही त्यांचं असंच सहकार्य मिळेल, ही अपेक्षा! तसंच राज्यात हातावर पोट असलेल्यांसाठी एखादी योजना आणण्याची गरज आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दुपारी ३ वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली. उद्धव ठाकरेंनी बैठकीआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. यामध्ये परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यामुळे काही निर्बंध कडक करावे लागतील. विरोधीपक्ष म्हणून तुम्ही सहकार्य करा, असं उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. यानंतर आवश्यक त्या उपाययोजनांना आम्ही सहकार्य करु. आम्हाला कोरोनाबाबत राजकारणापेक्षा जनतेचे हित कायम महत्वाचे राहिले आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. भाजपा सरकारच्या पाठीशी नक्कीच उभी राहील, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

You might also like