केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमीच; पेट्रोल डिझेल दरवाढी वरून रोहित पवारांचा केंद्राला खोचक टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पेट्रोल डिझेल आणि गॅस च्या दरवाढीनमुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असून विरोधक याच मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत असतात . राज्यात तर ठिकठिकाणी विरोधकांकडून वाढत्या महागाईवरून निदर्शने करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकार वर टीका खोचक टीका केली आहे

महागाईच्या ओणव्यात आज सामान्य माणूस भाजून निघतोय, पण चक्क दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत. कदाचित आजपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात टीकेची तीव्रता कमी व्हावी म्हणून ते स्थिर असावेत! पण काही का असेना, यामुळं केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमी आहेत! असा खोचक टोला रोहित पवार यांनी केंद्राला लगावला.

दरम्यान आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढीचा फटका, राज्यांना लस मिळत नसणे, शेतकरी विरोधी कायदे आदी विषयांवर विरोधकांनी संसद अधिवेशनात आवाज उठविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे संसदेचे कामकाज वादळी ठरण्याची शक्यता आहे.

Leave a Comment