अभिनय चांगला होता मात्र वेळ अन् ठिकाण चुकलं; रुपाली चाकणकर यांचा नवनीत राणा यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचा अभिनय चांगला होता पण मात्र वेळ अन जागा चुकलीय असा टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर दबंग कामगिरी बजावत असलेल्या दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. वरिष्ठ डीएफओ विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे. चव्हाण यांनी २५ मार्चला गोळी झाडून आयुष्य संपवलं होतं.

त्यावेळी काही वनपरिक्षेत्र महिला कर्मचारी या शिवकुमार यांची बाजू घेऊन खासदार राणा यांना भेटायला आल्या.त्या सगळ्या कर्मचाऱ्यांवर नवनीत राणा चांगल्याच भडकल्या असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.पण तो व्हिडिओ बनावट असल्याचे काही लोकांनी उघडकीस आणले.त्या व्हिडिओतील एक महिला खासदार चिडलेल्या स्वरात बोलत असताना देखील हसतांना दिसतेय तसेच ती महिला या आधी देखील राणा यांच्या सोबत बऱ्याच वेळा दिसली आहे.आता या प्रकरणावर टीका करायला सोडतील त्या रुपाली चाकणकर कसल्या त्यांनी लागलीच ट्विट केलं आणि हॅलो महाराष्ट्र सोबत बोलतांना राणांवर चांगलीच टीका केली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like