हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बद्दल महत्वाचं विधान केलं आहे. राज यांच्या हाती यश मिळालं नसलं तरी तरुणांच्या मनात त्यांच्या बद्दलची क्रेझ कायम आहे असं शरद पवार यांनी म्हंटल आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांना राज ठाकरेंविषयी एक प्रश्व विचारण्यात आला यावर त्यांनी आपलं उत्तर दिलं आहे.
त्यांना राज ठाकरेंच्या (raj Thackeray) क्रेझबद्दल विचारलं असता, त्यांनी सांगितलं की, ‘राज ठाकरे यांचा वेगळा पक्ष आहे. ते नेहमी आपली मतं स्पष्टपणे मांडत असतात आणि त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यांना निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नसलं तरी याचा अर्थ असा नाही होत की त्यांची तरुणांमधली क्रेझ संपली. राज यांची क्रेझ कायम आहे.’ पवारांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या विरोधात भाजप सोबत मनसेनं देखील आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतील लोकलप्रश्न, मंदिर खुली करण्यासाठीच आंदोलन, नुकतंच गाजलेल्या वाढीव वीजबिल माफीसाठी राज्यभरात केलेलं आंदोलन असे अनेक आंदोलन मनसेने केली होती.
दरम्यान, काँग्रेस बद्दल आणि राहुल गांधी यांच्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, ‘काँग्रेसमधील बरेच नेते आजही गांधी आणि नेहरूंचा वारसा जपतात. सोनिया आणि राहुल हे दोघेही याच घराण्याचे आहेत. आणि कुठल्याही राजकीय पक्षातील लोकांमध्ये नेतृत्वाची मान्यता किती आहे, यावरून नेतृत्व ठरत असते. वस्तुस्थिती अशी आहे की, बहुतांशी काँग्रेसजनांना राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचं नेतृत्व मान्य आहे.’
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’