शरद पवारांच्या भर पावसातील सभेची वर्षपूर्ती ; साताऱ्याच्या ‘त्या’ ऐतिहासिक सभेने बदलले राज्याचे राजकारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी शरद पवारांची ती भर पावसातील ऐतिहासिक सभा मागच्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजे 18 ऑक्टोबर ला झाली होती. या सभेने फक्त साताऱ्याचेच तर राज्याचे राजकारण बदलले होते. 80 वर्षाचे शरद पवार भर पावसात भाजपवर तुटून पडले होते. आणि राज्यातील युवा पिढी त्यांना भरगोस पाठिंबा देत होती. जसा पाऊस बरसत होता तसेच पवारही भाजपवर बरसत होते. त्याच्या थेट फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला झाला. सत्तेची आशा नसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेशी महाआघाडी करत राज्यात सत्ता स्थापन केली. भाजपच्या गर्वाचे घर खाली आले. म्हणूनच या दिवसाचे महत्व!सातारा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचा एकेक बुरुज ढासळत होता. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजेंना भाजपने पक्षात घेतले होते. त्यामुळे साताऱ्याचा हा गढ राखण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार स्वत: रणांगणात उतरले.

या सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी सभा झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सभेबद्दल उत्सुकता होती. पाटणमधील सभा उरकून पवारांनी साताऱ्यातील सभेच्या मैदानावर पाऊल ठेवताच पाऊस सुरू झाला; पण लोक जागचे हलले नाहीत. पवार बोलायला उभे राहिले आणि पावसाचा जोर वाढला. लोक समोर भिजत असल्याने पवारांनी डोक्यावरची छत्री बाजूला केली आणि धो-धो पावसाबरोबरच धीरगंभीर आवाजात शरद पवारही बरसू लागले. ‘गतवेळी माझी चूक झाली, ती दुरुस्त करण्याचे काम सातारकरांनी करावे’, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले आणि साताराच नव्हे तर, संपूर्ण राज्याचे राजकारण या सभेने बदलून टाकले.

पवारांच्या या सभेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने या सभेच्या वर्षपूर्तीसाठी एका छोटेखानी सभेचे आयोजन केले आहे.नरेंद्र मोदींच्या तुलनेत सभा कशी होणार हे पाहण्यासाठी विरोधकही आले आणि सर्वात मोठी सभा झाली. या सभेमुळे पुन्हा एकदा शरद पवारांचा करिष्मा सर्वांना पाहायला मिळाला. प्रतिकुल परिस्थितीमध्येही शरद पवार लढत राहिले आणि शेवटी विजय सुद्धा मिळवला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment