शरद पवार पुन्हा ऍक्शन मध्ये; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन मोठ्या शस्त्रक्रियांनंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. नुकतंच शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी कोरोना संकटाच्या काळात काही घटकांना मदत करण्याचा सल्ला दिला आहे. राज्यातील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मदत द्या, असा सल्ला पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे

या पत्राबाबत सूचना करातानाचं फेसबूक लाईव्ह सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. यामध्ये शरद पवार कशा प्रकारे मदत करावी, केंद्राकडून कोणत्या योजनांद्वारे मदत देता येईल, असा सूचना करताना दिसत आहेत. शरद पवारांनी प्रामुख्यानं शेतकरी आणि लहान व्यावसायिकांना मदत करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली.

शरद पवार यांच्यावर नुकतीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like