आमदार भारत भालके यांचं जाणं मनाला चटका लावणारं ; शरद पवारांनी जागवल्या आठवणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आमदार भारत भालके यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे. त्यांच्या गेल्याने मोठं नुकसान झालं आहे, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलून दाखवली. भारत भालके यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज ते पंढरपूरला गेले होते. तेव्हा त्यांनी भारत भालकेंच्या आठवणींना उजाळा दिला. निवडणुकीनंतर विजयी झाल्यावर भारत नाना बारामतीला येत. तिथे आल्यावर एक हार माझ्या हातात देणार आणि म्हणायचे मी तुमच्या बरोबर आहे. हिच भूमिका त्यांनी अखेरपर्यंत शेवटच्या निवडणुकीपर्यंत ठेवली. त्यांनी कायमच साथ दिली असे शरद पवार यांनी म्हंटल आहे.

काही गोष्टी तुमच्या आमच्या हातात नसतात. पंढरपूरच्या विकासासाठी भारत नानांनी मोठी धडपड केली. भारत नाना जरी आज आपल्यात राहिले नाहीत तरी त्यांचे कर्तृत्व, त्यांची माणुसकीची भावना आणि विभागाच्या विकासासाठी त्यांना असलेला ध्यास याचा विसर आपल्याला कधीही पडणार नाही.

सहकारी संस्था असेल, कारखानदारी असेल, पंढरपूर शहर असेल मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा हट्ट असेल, या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी आपली चिकाटी ठेवली. त्यामुळे ते आज नाहीत तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी ही आहे की त्यांचे हे अपुरे प्रत्येक स्वप्न जे स्वत:साठी नव्हतं विभागासाठी होतं, इथल्या लोकांसाठी होतं, ते स्वप्न पूर्ण करण्याची काळजी आपण घ्यायची.

पंढरपूर हे देशाचे महत्वाचे ठिकाण आहे. पंढरपूर आणि इथे असलेला पांडुरंग हा या देशातील सामान्य माणसाचा आधार आहे. कष्टकरी, शेतकऱ्यांचा तो देव आहे. त्या पंढरीचा आशीर्वाद ज्याला लाभेल तो भाग्यवान असेल. त्यामुळे पंढरपूर आणि परिसर हा एका दृष्टीने भाग्यवंतांचा परिसर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण ते भाग्य कुठे वळलं असेल तर त्याला जागेवर आणण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे.

भारत नाना कधी शेतकरी संघटनेतून कधी अपक्ष कधी आणखी कुठल्या पक्षातून निवडणूक लढवायचे. लोक मला म्हणायचे की या-या पक्षातून ते उमेदवार म्हणून उभे आहेत, काय करायचं?, मी सांगायचो निवडणूक लढवायची आहे तर लढवू द्या, काहीही केलं तरी तेच निवडून येणार.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment