मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण गरम झालं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादीच्या 22 व्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सत्ता ही जास्तीत जास्त हातांमध्ये गेली पाहिजे आणि ती तशी जायला हवी असेल तर आरक्षणाचे प्रश्न आपल्याला सोडवावेच लागतील,’ असं पवार यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार म्हणाले, ‘मराठा आरक्षण असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या जागेचा गंभीर प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवावेच लागतील. शेवटी सत्ता ही अधिकाधिक हातात गेली पाहिजे. सत्ता केंद्रीत झाली, एकाच हातात राहिली की ती भ्रष्ट होते. ती भ्रष्ट व्हायची नसेल तर ती अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे. हे सूत्र मान्य असेल तर एससी, एसटी, ओबीसी असतील, यातील प्रत्येकाला घटकाला मी सत्तेचा वाटेकरी आहे असं वाटलं पाहिजे. हे सगळं आपण जितकं जोमानं करू, तितका राष्ट्रवादी काँग्रेसला लोकांचा पाठिंबा मिळेल.

मी राज्याचा मुख्यमंत्री असताना ग्रामपंचायत, गावचे पोलीस पाटील यामध्येही ओबीसी आणि इतरांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील एका गावात गेलो असता चहासाठी एका घरी गेलो होते. तिथे जुने काही कार्यकर्ते होते. त्यांनी मला साहेब हे काम काही चांगलं केलं नाही म्हटलं. आमच्या गावची पाटीलकी गेल्यावर कसं व्हायचं असं ते म्हणाले. यावर नुकसान काय असं विचारलं असता ते उत्तर देऊ शकले नाही. पुन्हा पाच ते सात वर्षांनी भेट झाली असता गाव आता पूर्वीपेक्षा आता एकत्रित आहे असं सांगितलं. याचं कारण पिढ्यानपिढ्या सत्ता आमच्या घरात ठेवली होती. सत्ता अधिक लोकांच्या हाती गेली हे लोकांना आवडलं असल्याचं त्यांनी सांगितलं,” अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment