मुली उचलून आणण्याची भाषा वापरणारे आज साधूंसाठी आंदोलन करतायत; राष्ट्रवादीची राम कदमांवर बोचरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गतवर्षी आजच्या च दिवशी पालघर येथील साधूंच्या झालेल्या हत्येप्रकरणी त्याना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप नेते राम कदम पालघर याठिकाणी जायला निघाले होते. दरम्यान मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली असून घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. दरम्यान यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून राम कदम यांच्यावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीनं आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून म्हटलं की, भाजप नेते राम कदम पुन्हा एकदा पालघर साधू हत्याकांड प्रकरण चर्चेत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हे त्यांच्या अपयशाचं प्रतीक आहे. राज्यात फोफावत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या बाबतीत ते अजिबात गंभीर नाहीत, असंही राष्ट्रवादीनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

राम कदमांना उद्देशून दुसऱ्या एका ट्वीटमध्ये राष्ट्रवादीने बोचरी टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘करून करून भागले आणि देवधर्माला लागले, ही मराठीतील म्हण महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या ‘चमको’ नेत्यांना तंतोतंत लागू पडते. कालपर्यंत मुली उचलून आणण्याची भाषा वापरणारे आज साधूंसाठी आंदोलन करतायत. जणाची नाही तर मनाची तरी बाळगावी.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like