ईडीच्या कारवाईला घाबरत नाही, ईडी आली तर..; मलिकांचं खुलं आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ईडीच्यावतीने पुन्हा कारवाईचा धडाका सुरु करण्यात आलेला आहे. दरम्यान ईडीच्यावतीने आज ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट ईडीवर निशाणा साधला. “काहीजण म्हणत आहेत कि मलिक यांच्या घराजवळ ईडी येणार आहे. त्यांना एवढंच सांगतो कि, माझ्या घरापर्यंत ईडी आली तर आम्ही स्वागत करू, असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यभरात ईडीच्यावतीने ज्या ज्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली त्यातून त्यांना काही महत्वाचे धागेदोरे मिळाले. मात्र, ईडीच्या छापेमारीमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचे काम होत आहे. ईडीच्या कारवाईला मी घाबरत नाही. आदींची टीम आली तर मी त्याचे स्वागतच करेन.

महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर सात एफआयआर आम्ही दाखल केले आहेत. मी अल्पसंख्याक पदाचा चार्ज घेतल्यानंतर वक्फ अॅक्ट नुसार बोर्ड काम करण्यास स्वतंत्र आहे. कोणी आमच्याकडे तक्रार केलीस त्यावर आम्ही चौकशी समिती नेमू शकतो. महाराष्ट्रात पहिल्यांदाच दहा सदस्यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीद्वारे दोन जणांचे नाव आले होते. त्यातील एकाची नियुक्ती केली गेली, काही जागा भरायच्या आहेत. पण पहिल्यांदाच फुलफेज बोर्ड बनलं आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली आहे.

Leave a Comment