एनसीबीच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा प्रयत्न, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाकडून आर्यनचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. याप्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मलिक यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद सोडला. यावेळी ते म्हणाले की, एनसीबीच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा प्रयत्न सध्या चाललेला दिसत आहे. वानखेडेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात असल्याने यात विशेष बाब म्हणजे काहींना जामीन मिळवून देण्याचा एनसीबी मदत करत आहे.

भाजप, एनसीबी आणि काही गुन्हेगार महाराष्ट्रात दहशत वाजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचे रितसर पुरावे पुढच्या आठवड्यात आपण पत्रकार परिषद घेऊन देणार आहोत, असे मलिक यांनी म्हंटले आहे. या प्रकरणी एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी या प्रकरणावर सुनावणी घेतली. आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनुमन धामेचा या तिघांचाही जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळून लावला आहे.

Leave a Comment