नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र ; केली ‘हि’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या चौकशी प्रकरणी एक ट्वीट करीत लवकरच आणखी पुरावे सादर करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, त्यांनी आज एका अज्ञात एनसीबी अधिकाऱ्याचे निनावी पत्र दिल्लीतील एनसीबीच्या महासंचालकाना पाठवले आहे. एनसीबीकडून सुरू असलेल्या तपासाबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने पाठवलेल्या पत्रात समीर वानखेडे आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे खोटे प्रकरण केली तसेच खोट्या केसेस टाकून लोकांना अडकवले जात असल्याचा आरोप केला आहे. तर या प्रकरणी मलिक यांनी या निनावी पत्रासह एनसीबीच्या महासंचालकांकडे तक्रार केली आहे.

मलिक यांनी यापूर्वीही अनेक आरोप समीर वानखेडे यांच्यावर केले आहेत.
वानखेडे यांच्या जन्म दाखल्यावर वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचे दर्शवणारी दाखल्याची प्रतच मलिक यांनी सकाळी सादर केली. समीर यांचे आई-वडिल मुस्लीम होते मग त्यांनी राखीव कोटय़ातून भारतीय महसूल सेवेत प्रवेश कसा मिळविला, असा सवालही मलिक यांनी केला होता.