Wednesday, October 5, 2022

Buy now

नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर जयंत पाटलांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले कि …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. अशात आता राज्यातील सर्वच पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी करू लागले आहेत. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देत काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणारअसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पक्षांतर्गत जे निर्णय घेतले आहेत. त्याबद्दल बंधनही नाही. त्यांनी त्याचा पक्ष कसा चालवायचा हा त्यांचा प्रश्न आहे, असे पाटील यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याच्या निर्णयावर मत व्यक्त केले. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी गाव स्थरापर्यंत टिकावी. याला सर्वानी प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. आमच्या तीन पक्षांव्यतिरिक्त जे काही इतर मित्र पक्ष आहेत. त्यांचा काही संस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत वेगळा विचार झाला तर उरलेले पक्ष एकत्रित राहतील, असा मला विश्वास आहे.

त्यामुळे नाना पटोले यांनी पक्षांतर्गत काय निर्णय घेतले आहेत. यावर आम्ही भाष्य क्षणात नाही. कारण त्यांनी त्याचा पक्ष कसा चालवायचा, तो पुढे कसा वाढीस न्यायचा हा तो त्याचा प्रश्न आहे, असे मंत्री जयंत पाटील म्हणाले.