गोवा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज; 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कंबर कसली असून राष्ट्रवादी कडून 13 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच आपण स्वतः 3 दिवस प्रचाराला गोव्याला जाणार आहोत असेही त्यांनी सांगितलं.

गोव्यात भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आघाडी केली आहे. यापूर्वी शिवसेनेनं आपली उमेदवार यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीने नेमक्या किती जागा लढवणार हे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी कडून 13 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असतील असे नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच पणजी मतदारसंघात उत्पल पर्रीकर यांना जनतेचा जोरदार पाठिंबा मिळत असून आमच्या पक्षाचा त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका गोव्याचे अध्यक्ष घेतील असेही नवाब मलिक यांनी सांगितले

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने 24 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री  अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह 24 नेत्यांचा समावेश आहे. गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याने सर्वच पक्षांचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे.

Leave a Comment