पार्थ प्रचार : नवनीत राणांचा रोड शो ; कॉंग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यामध्ये हाणामारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लोणावळा प्रतिनिधी | मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार  पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा यांच्या रोड शोचे आयोजन लोणावळा या ठिकाणी करण्यात आले होते. त्यावेळी नवनीत राणा यांना यायला उशीर झाल्याने पुणे जिल्हा काॅग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा अर्चना शहा यांच्या रोड शोला सुरुवात करण्यात आली त्यानंतर शिवाजी चौकात नवनीत राणा यांचे आगमन झाले. त्यांनी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या फोटोला हार घालून रोड शोची सुरुवात केली.  याच वेळी कॉंग्रेसच्या अर्चना शहा यांनी त्यांचे कॉंग्रेसचे कार्यकर्ते मागे ढकलण्यात आले. तेव्हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकत्यामध्ये हाणामारी झाली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकत्यांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याने काहींनी शिवाजी चौकातूनच घरचा रस्ता धरला. नवनीत राणा यांच्या आगमना पूर्वी हव्या हव्या वाटणाऱ्या कॉंग्रेस नेत्या  अर्चना शहा नवनीत राणा दाखल होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नको नकोशा वाटू लागल्या. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अशा वर्तनामुळे कॉंग्रेसच्या कार्यकत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

फोटो व्हायरल करून काय होत नसत. अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यात दम आहे. म्हणून त्यांनी बारामतीतून बाहेर पडून निवडणूक लढून दाखवली आहे. २३ मी रोजी आम्हीच विजयी होणार आहे. तसेच आम्हीच विजयाची मिरवणूक काढणार आहे असे नवनीत राणा यांनी या रोड शोच्या वेळी म्हणाले आहे.

 

Leave a Comment