Saturday, January 28, 2023

राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसकडून विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवून स्वागत

- Advertisement -

कराड | कोव्हीड 19 मुळे गेले अनेक दिवस विद्यालये बंद असल्यामुळे लहान मुले-मुली ऑनलाईन शिक्षण घेत होते. परंतु गेल्या काही महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या तुलनेने कमी होत असल्यामुळे शासन स्तरावर विद्यालये कोरोना नियमांचे पालन करून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या कालावधीनंतर विद्यार्थी आता शाळांमध्ये नव्या पर्वाची सुरुवात करत आहेत. तेव्हा शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसकडून गुलाब पुष्प देऊन विद्यालयामध्ये स्वागत करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल शिंदे, सहकारी समीर कुडची, ऋषभ डूबल, सूरज जाधव, दत्ताभाऊ निकम, अथर्व साळुंखे, अमित ताटे उपस्थित होते. श्री. सिद्धिविनायक शिक्षण संस्था, उरुल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तासवडे, यशवंत शिक्षण संस्था, सदाशिव गड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाघेश्वर मसूर येथील विद्यालय मध्ये जाऊन, शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांचे गुलाब पुष्प व पेन देऊन स्वागत केले.

- Advertisement -

त्यावेळी निवासराव निकम, महाराष्ट्र राज्य युवा वारकरी महामंडळचे कराड ता. उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, तासवडे ग्रा. पं. सदस्य निवासराव जाधव, जयवंत गुरव, शिवाजीराव जाधव, अशोक क्षीरसागर, संतोष जाधव, मुख्याध्यापक सदाफुले मॅडम, व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.