साजूरला सोसायटी निवडणूकीत राष्ट्रवादीचा 13-0 असा मोठा पराभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | साजुर येथील श्री. साजुरेश्वर सहकारी रयत पॅनेल सोसायटीच्या निवडणुकीत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई व ॲड. उदसिंह पाटील दादा तसेच कराड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन हणमंतराव चव्हाण (आप्पा) यांच्या गटाच्या पॅनलने 13-0 असा नामदार बाळासाहेब पाटील व राष्ट्रवादीचे ‍सत्यजित पाटणकर यांना मानणा-या विरोधी पॅनेलचा मोठ्या फरकाने पराभव केला.

विकास सेवा सोसायटी निवडणूकमध्ये एकूण मतदान 359 होते. त्यापैकी 345 मतदान झाले श्री. साजुरेश्वर सहकारी रयत पॅनेलमधून सर्वसाधारण कर्जदार सभासद गटातून देविदास चव्हाण (200), मोहन चव्हाण (215), भगवान चव्हाण (202), प्रदिप चव्हाण (190), मारूती चव्हाण (205), हंबीरराव चव्हाण (204), अनिल निळुगडे (198), विलास मुळगावकर (212), महिला राखीव गटातून, शांताबाई चव्हाण (210), विद्या चव्हाण (209), अनुसूचित जाती/जमाती  राखीव मधून तानाजी कांबळे (216), इतर मागासवर्ग राखीव मधून धनाजी  कुंभार (211), तसेच लक्ष्मण मोहिते हे विषेश मागास प्रवर्गातून बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे माजी  पंचायत सदस्य विजय चव्हाण यांच्या गटाचा व त्यांचा 13/0 या मोठ्या फरकाने पराजय झाला. विजय चव्हाण हे स्वत: उमेदवार होते. त्यांना फक्त 124 मतामध्ये समाधान मानावे लागले आहे.

श्री. साजुरेश्वर सहकारी रयत पॅनेलचे नारायण चव्हाण, विजय प्र.चव्हाण हे विजयाचे महत्वपूर्ण मानकरी ठरले. तसेच यामध्ये संजय मुळगावकर, राजेंद्र दिवसकर, दिपक चव्हाण, वैभव चव्हाण, दादासो  चव्हाण, बालाजी मोहिते, सागर चव्हाण, विक्रम मुळगावकर, योगेश चव्हाण, सुभाष चव्हाण यांनी नेतृत्व केले. तसेच सर्व विजयी उमेदवारांचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई व युवा नेते ॲड. उदयसिंह पाटील, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी अभिनंदन केले.

Leave a Comment