चंद्रकांत पाटलांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे गाणं; ऑपरेटर वर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार गीत असलेलं राष्ट्रवादी पुन्हा हे गाणं खूप कमी वेळातच राज्यभर चर्चेत आलं. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यक्रमात या गाण्यावर कार्यकर्त्यांना नाचताना आपण पाहिलं असेलच. पण आता चक्क भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील एका कार्यक्रमात हे गाणं लावण्यात आल्याने अनेकाना आश्चर्याचा धक्का बसला आहे. याप्रकरणी विनापरवाना साउंड सिस्टीम लावल्याच्या आरोपाखाली ऑपरेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवाळीनिमित्त पुण्यातील रास्ता पेठेत असलेल्या एका कार्यक्रमात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली होती.यावेळी पाटील यांची एन्ट्री होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार गीत वाजविण्यात आले, त्यामुळे पालकमंत्र्यांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे प्रचार गीत लावण्यात आली की काय, अशा चर्चा सुरु होऊ लागल्या.

यानंतर पोलिसांनी साउंड सिस्टमवाल्या व्यक्तीला ताब्यात घेतले. विनापरवाना साउंड सिस्टीम लावण्यात आलं असं कारण देत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताला राष्ट्रवादी पुन्हा गाणं वाजल्यामुळे संपूर्ण प्रकरणाची पुण्यात मात्र जोरदार चर्चा सुरु आहे. अचानकपणे हे गाणं वाजल्याने अनेकांकडून आश्चर्यही व्यक्त करण्यात येत आहे.