व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

‘हा माज तुमच्या घरी दाखवा’; महिला अधिकारी शिवीगाळ प्रकरणी चाकणकरांचा संताप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे येथील भाजप आमदाराची एका महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या क्लिपवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संताप व्यक्त केला आहे. “भाजपा आमदाराने हा माज आपल्या घरी दाखवावा, मनपाचे कर्मचारी तुमचे नोकर नाहीत, अशा शब्दात चाकणकरांनी हल्लाबोल केला आहे.

भाजप आमदाराच्या व्हायरल व्हिडीओ क्लिपवरुन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करीत हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “आमदार सुनील कांबळे ही व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती आहे. महिलांना सातत्याने कमी लेखणे, पदोपदी महिलांचा अवमान करणे ही भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती असून महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ करणारे आमदार सुनील कांबळे हे केवळ त्या प्रवृत्तीचे एक उदाहरण आहे.”

भाजपच्या असंस्कृतपणाच्या चिखलात अशीच कमळं उगवणार. त्यामुळे आमदारांनी तत्काळ माफी मागावी. आपल्या कृतीतून संघाचे संस्कार तुम्ही दाखवून दिलेत. पण आता झाल्या प्रकाराबद्दल महिला अधिकाऱ्याची आणि तमाम महिला वर्गाची तुम्ही माफी मागावी, असे चाकणकरांनी म्हंटले आहे.