स्वॅब वाढल्याने बाधित वाढले, मात्र रेट कमी : सातारा जिल्ह्यात आज नवे 2 हजार 648 पाॅझिटीव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 2 हजार 648 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 198 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 21 हजार 321 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 51 हजार 387 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 26 हजार 631 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3425 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दिवसभरात 35 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

कोरोना टेस्ट वाढविल्याने कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. आज आलेल्य रिपोर्टमध्ये 14 हजार 356 स्वॅब घेण्यात आलेल्यापैकी 2 हजार 648 पाॅझिटीव्ह आलेले आहेत. त्यामुळे स्वॅब वाढल्याने पाॅझिटीव्ह संख्या वाढलेली आहे. त्यामुळे पाॅझिटीव्ह वाढले असले तरी रेट हा (18.45) कमी आलेला आहे.

आज मध्यरात्रीपासून पोलिसांनी कडक अंमलबजावणी करावी शंभूराज देसाई

सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याकरीता दि. 24 मे च्या मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, सातारा यांनी काढले आहेत. सातारा शहरात जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दोन दिवसापुर्वीच सांगून कडक लॉकडाऊन केला आहे. दि. 24 मे पासून आठ दिवसाचे सुरु होणाऱ्या संपुर्ण सातारा जिल्हयातील लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Leave a Comment