पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल (Bihar Vidhansabha Election Result) अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार राजदला (RJD) शंभरपेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळाली होती. मात्र, आता निकाल कलाटणी घेताना दिसत आहेत.
मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आघाडीवर असलेली महागठबंधन आता पिछाडीवर पडली आहे. तर भाजपप्रणित एनडीएने आता जवळपास 119 जागांवर आघाडी घेतली आहे. बहुमतासाठी 122 जागांची गरज आहे.
NDA आघाडीवर
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि RJD ची महाआघाडी सुरुवातीच्या कलानुसार आघाडीवर होती. पण आता हाती येत असलेल्या कलानुसार नितीश कुमार यांचा JDU आणि भाजपची महायुतीनं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी नितीश कुमार यांचा JDU पक्ष तिसऱ्या क्रमांकावरच राहण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंतच्या कलानुसार RJDला 76, भाजपला 65, JDU ला 50 तर कांग्रेसला 20 जागा मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in