..म्हणून चीनने लपवला आपल्या मृत सैनिकांचा आकडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पेईचिंग । भारत आणि चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात हिंसक संघर्ष झाला. या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. दरम्यान, काही वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी भारतीय सैन्याने केलेल्या प्रत्युत्तरात चीनचे 43 सैनिक मारल्याचा दावाही केला आहे. मात्र चीनने अद्याप मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही. तणाव वाढवायचा नसल्यामुळे आकडा जाहीर करणार नसल्याचं चीनने म्हटलं आहे. पण आता चीनबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. अमेरिकेच्या भीतीमुळे चीनने मृत सैनिकांचा आकडा लपवला असल्याची माहिती समोर आली आहे.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीन आणि अमेरिका यांच्यात एक महत्त्वाची बैठक होणार होती. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर चीनने भारतासोबत घडलेली घटना किरकोळ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. या धोरणांतर्गत चीनने मृत सैनिकांचा आकडाही जाहीर केला नाही. चीनी सैन्याचे प्रवक्‍ते झांग शुइली यानी हिंसक झटापटीत दोन्ही बाजूंनी जीवितहानी झाली आहे असं सांगितलं मात्र मृतांचा आकडा सांगण्यास नकार दिला आहे.

पीएलएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या सैनिकांच्या मृत्यूबद्दल चीन अत्यंत संवेदनशील आहे. सैनिकांच्या मृत्यूचे आकडे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या मंजुरीनंतरच समोर येतील. शी जिनपिंग हेच सैन्याचे अध्यक्ष आहेत. त्यामुळ यामागे त्यांचाच संबंध आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांच्यासोबत बैठक होणार होती. भारता-चीन सीमा वादावर यामध्ये चर्चा करण्यात आली. अमेरिकेसोबतच्या या बैठकीत भारतासोबतच्या संघर्षाचा मुद्दा उचलला जाऊ शकतो, ही भीती चीनला होती. चीनला काहीही करुन पॉम्पियो-यांग यांच्या बैठकीअगोदर तणाव कमी करायचा होता. पण एखादा देश या तणावाचा गैरफायदा घेत असेल, तर आमच्या सैनिकांना योग्य ते उत्तर देता येतं असं म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment