पाटण तालुक्यात NDRFची शोध मोहीम थांबली, 30 पैकी 29 मृतदेह सापडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन दरडी कोसळण्याचे प्रकार झाले होते. या दुर्दैवी घटनेत पाटण तालुक्यातील तीन गावातील 30 जणांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यापैकी 29 जणांना शोधण्यात यश आले आहे. अद्याप आंबेघर येथील 9 महिन्याचे बाळ अद्याप सापडले नसुन त्यांच्या पालकांची परवानगी घेऊन शोधमोहीम थांबवण्यात आली आहे.

पाटण तालुक्यातील आंबेकर येथे 15, मीरगाव येथे 11 आणि ढोकवळे येथे चार लोकांचा भूस्खलनाच्या घटना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भूसखलनाची घटना गुरुवारी रात्री झालेल्या होत्या. त्यानंतर गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसात या भागात कोसळणाऱ्या पावसामध्ये शोध कार्य करता आले नव्हते. या तिन्ही ठिकाणी एनडीआरएफ व स्थानिक लोकांनी संयुक्त शोध मोहीम राबवली तसेच प्रशासनानेही या ठिकाणी तळ ठोकून शोध कार्य केले.

भूस्खलन दुर्घटनेत अनेक लोकांची घरे मोजली गेली त्याचबरोबर काही ठिकाणी जनावरे मृत्युमुखी पडली तर जखमीही मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत. पाटण तालुक्यात दुर्घटना घडलेल्या घटनास्थळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भेट दिली आहे तर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही कोयनानगर येथे येथील दुर्घटना यांचा आढावा घेतला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या भागाचा पाहणी दौरा करणार होते पूरग्रस्तांची विचारपूस करणार होते मात्र अति पावसामुळे व हवामान बिघाडामुळे दौरा रद्द झाला आहे

Leave a Comment