नीरज चोप्राने रचला इतिहास! जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मिळवले रौप्यपदक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारताच्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भालाफेकीत पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. रविवारी सकाळी वर्ल्ड एथलॅटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत नीरजने (Neeraj Chopra) रौप्यपदक जिंकले आहे. या स्पर्धेत ग्रीनादाच्या अँडरसन पीटर्सने 90.54 मीटर अंतरापर्यंत भालाफेकून सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देऊन इतिहास रचला होता. अंजू बॉबी जॉर्ज नंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक विजेती कामगिरी करणारा नीरज चोप्रा दुसरा भारतीय क्रीडापटू आहे. तब्बल 19 वर्षानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये भारताला पदक मिळालं आहे. अंजू बॉबी जॉर्ज यांनी 2003 साली पॅरिस येथे लांब उडीत सुवर्णपदक जिंकले होते.

युजीनमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर अंतरावर भाला फेकत अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं होतं. दरम्यान, रविवारी पार पडलेल्या अंतिम फेरीत चौथ्या प्रयत्नावेळी नीरज चोप्राने (Neeraj Chopra) 88.13 मीटर अंतरावर भाला फेकला आणि रौप्यपदक आपल्या नावे केलं. 24 वर्षीय नीरजने अग्रस्थान मिळवल्यास ऑलिम्पिक विजेतेपदापाठोपाठ जगज्जेतेपद पटकावणारा तो तिसरा भालाफेकपटू ठरला असता.

नीरज चोप्रा कुटुंब आणि शिक्षण
नीरजचा (Neeraj Chopra) जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खांद्रा या छोट्याशा गावात एका शेतकऱ्याच्या घरी झाला. नीरजनं प्राथमिक शिक्षण पानिपत येथून केलं. प्राथमिकचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर नीरज चोप्रानं चंदीगडमधील बीबीए कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तिथून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.

हे पण वाचा :
जनतेने एकदा ठरवले तर भले भले घरी बसवतात; अजित पवारांचं सूचक विधान

अमेरिकन बाजारातील घसरणीने मोडला 50 वर्षांचा विक्रम !!!

हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची निवड

एकनाथ शिंदेनी केल्या ‘या’ दोन मोठ्या घोषणा

Leave a Comment