दिल्ली वृत्तसंस्था :
पंजाब नॅशनल बॅंकेच्या १३००० हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदी ला अटक करण्यात यश आलं आहे. त्याच्या नावे अटक वोरन्ट जारी करण्यात आली होती.गेल्या काही दिवसापासून तो लंडन मध्ये राहत होता. नीरव मोदी ला भारतात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांमध्ये वाकयुद्ध चालू होते. पंजाब नेशनल बॅंक चा तब्बल १३००० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.
अनेक काही दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीच्या कैमरात तो कैद झाला होता. परंतु त्या वेळी त्याने कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणे टाळलं होतं. अखेर लंडन न्यायालयाने त्याच्या नावे वोरन्ट काढले. नीरव हा गेल्या अनेक दिवसापासून पत्नी अमी मोदी सह राहत होता. ज्या भागात तो राहत होता त्या फ्लॅटचं भाडं १७००० पाउंड म्हणजे १७ लाख रुपये असल्याचा अंदाज आहे.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार नीरव मोदी हे तिथून सुद्धा हिऱ्याचा व्यापार चालवत आहेत. आणि त्यांचा दररोज चा दिनक्रम हा सकाळी ऑफिस ते घर इतकाच असून कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ते सहसा हजेरी लावत नाही.
अनेक वृत्तवाहिन्यांनी त्यांना आपल्या कैमरात कैद केले होते परंतु कोणत्याही प्रश्नांना उत्तरे न देता टाळणाऱ्या मोदी ला अखेर आज अटक करण्यात आली आहे.